Tuesday, June 16, 2009

kadhi kahi

तुम्हाला असे कधी होते का?
अचानक काहीतरी जुने आठवते आणि मग त्यातच मन गुंतून जाते...आणि जाणवते कि आपण किती चुकीचे वागलो होतो त्या वेळी..अचानक खूप अपराधी वाटते..मला आजकाल असे खुपदा होते. आणि मग मी नवरा ला सांगायला गेले कि तो म्हनतो..हे सगळे रिकाम्या मनाचे खेळ आहेत..तुला खूप मोकळा वेळ आसतो..मानून जास्त विचार करतेस तू...कदाचित हे खरेही असेल..पण मला मात्र असे नाही वाटत..जाऊ दे मग मी ठरवले त्याला काही सांगण्या पेक्षा आपण लिहूनच काढावे.
तर की होते ना मला कुठलाही गोष्टी वरून एकदम एखादी व्यक्ती आठवते..मग त्या व्यक्ती सोबत घालवलेले अनेक चांगले वाईट क्षण आठवतात आणि नंतर काहीतरी छोटासा गैरसमज होईन ती व्यक्ती दुरावली हे पण आठवते...मग सगळ्या झालेल्या गोष्टींचा मी परत विचार करू लागते...जितका जास्त विचार करते तितके मला आसे वाटते कि अरे हे तर माझे पण चुकले होते..जरी ती व्यक्ती चुकली असेल..तरी आसे वाटते कि आपण तिला सांभाळून घायला हवे होते..पण तसे नाही झाले. मी पण तितक्याच हट्टाने वागले..किव्हा मी माझाकडून गैरसमज दूर करायचा प्रयत्न केला नाही..किव्हा मी असे काही वागले कि ज्याने गैरसमज झाला..किव्हा मी अजून काही लोकांना आमचा मैत्री मध्ये आणले ज्यामुळे ती व्यक्ती अजून दूर गेली..माहित नाही नक्की की झाले.पण जे झाले त्यात माझीच खूप चूक आहे आसे वाटू लागते अचानक पाने..मग मी स्वतःचा स्वभाव परत परत पडताळून बघते..खरच का मी इतकी ह्तिति आहे? इतकी तापट आहे? इतकी हलक्या कानाची आहे? माहित नाही..पण मग मला खूप अपराधी वाटू लागते..मी न केलेल्या गुन्हाची..मी न वाईट वागता तुटलेल्या मैत्रीची जबाबदारी मी एकटीच घेते..अशा वेळी मला खूप निराशवादी वाटते..सगळ जवळ असून सुद्धा काहीतरी हातातून निसटून जावे असे वाटते...पण मग हे हि जाणवते कि मी परत भूतकाळात जाऊन ती गोष्ट बदलू शकत नाही...आहे ते असे आहे..हे मानून पुढे जावे लागतेच ना ? तेच मी करते..
पण तुम्हाला पण असे कधी होते का?